
गुगलने आपले बहुप्रतीक्षीत पॉवरफुल आणि फास्ट एआय मॉडेल जेमिनी 3 ला लाँच केले आहे. कंपनीने जेमिनी 3 ला नवीन पॉवरफुल एआय मॉडलसोबत आणले आहे. त्यामुळे आता ओपनएआयला जोरदार टक्कर मिळणार आहे. जेमिनी 3 हे इंटेलिजेन्ट मॉडल आहे, असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. जेमिनी 3 कठीण प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी यात पॉवरफुल कोडिंगची डिझाइन करण्यात आले आहे, असे पिचाई म्हणाले. जेमिनी 3 ला गुगल एआय प्रो आणि अल्ट्रा सब्सक्रायबर्ससाठी जेमिनी अॅपमध्ये, सर्चसाठी एआय मॉडलमध्ये, डेव्हलपर्ससाठी जेमिनी एपीआय, एआय स्टुडिओ उपलब्ध करण्यात आले आहे.


























































