आधार-पॅन लिंकसाठी 31 डिसेंबर डेडलाईन

पॅनकार्ड आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. या तारखेपूर्वी पॅन-आधार लिंक केले नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल. जर पॅन निष्क्रिय झाले तर अनेक आर्थिक कामे पूर्ण करण्यास अडचणी येतील.

आधार-पॅन करा लिंक करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. घरबसल्या हे काम आपण करू शकतो. इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन लिंक आधार हा पर्याय निवडून आधार-पॅन लिंक करता येते. नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार लिंक करणे अनिवार्य आहे. तसेच ओळखप्रक्रिया सोपी आणि जलद बनवण्यासाठी बँक व वित्तीय संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी आपल्या ग्राहकांची ई-केवायसी, ओटीपी किंवा व्हिडीओ व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पूर्ण करावी.