
कासारवडवलीच्या विहंग व्हॅली येथून ठाणे स्टेशनकडे आज सकाळी प्रवासी घेऊन निघालेल्या ठाणे परिवहनच्या टीएमटी बसच्या टायरमधून अचानक धूर येऊ लागला. दरम्यान, बसमधून प्रवास करणाऱ्या 20 प्रवाशांना तत्काळ सुखरूप उतरवण्यात आले. बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असून काही मिनिटात परिस्थिती नियंत्रण आणण्यात यश आले.
टीएमटी बसचालक हिमान शेख आणि वाहक विशाल तारमाळे हे दोघे सकाळी ठाणे स्टेशन येथे निघाले. त्यावेळी बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. ही बस सेंट्रल जेल तलावसमोर येताच चाल क हिमान यांना टायरमधून अचानक धूर येताना दिसला. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्यांनी तत्काळ माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत टायरला आग लागण्यापूर्वीच पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आली.





























































