
रेल्वेच्या एसी कोचमध्ये केटलमध्ये मॅगी बनवाऱ्या महिलेविरोधात मध्य रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. मध्य रेल्वेने सोशल मीडियावर पोस्ट करत व्हिडिओमधील महिलेविरुद्ध आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या चॅनेलविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगितले. अशा कृतींमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो आणि ट्रेनच्या एसी आणि इतर पोर्टचे नुकसान होऊ शकते, असे रेल्वेने नमूद केले.
रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंटमध्ये किटली लावून मॅगी बनवताना महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आली. व्हिडिओ व्हायरल होताच मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करत संबंधित महिला आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.
गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक किटली वापरणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. हे केवळ असुरक्षित आणि बेकायदेशीरच नाही तर दंडनीय गुन्हा देखील आहे. कृतींमुळे आगीच्या घटना घडू शकतात आणि इतरांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असे रेल्वेने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.






























































