ट्रेंड – ‘बिग बॉस’मध्ये फेकाफेकी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. सध्या रिऑलिटी शो ‘बिग बॉस’चे 19 वे सीझन सुरू आहे. यातील एक स्पर्धक असलेली तान्या मित्तल नावाची तरुणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. याचे कारण म्हणजे तिने या शोमध्ये प्रचंड फेकाफेकी केली आहे. यावरून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अडीच हजार स्केअर फुटाची जागा केवळ तिच्या कपडय़ासाठी आहे. तिच्या घरातील किचनमध्ये लिफ्ट आहे. दुबईत मिळणारा बकलावा खाण्यासाठी ती मुंबईहून दुबईला जाते अन् परत येते. तिच्या सुरक्षेसाठी 150 बॉडीगार्ड आहेत. एकदा साडी वापरली की, ती परत ती साडी नेसत नाही. आग्य्राच्या ताजमहलसमोर ती कॉफी पिते. तिच्या या फेकाफेकीमुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली आहे.