असं झालं तर… फ्लाईट मिस झाली तर…

देशात किंवा परदेशात जाण्यासाठी फ्लाईटने प्रवास करणाऱयांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे जर फ्लाईटच्या वेळेत पोहोचता आले नाही तर काय कराल.

सर्वात आधी तुमच्या एअरलाईनच्या सेवा डेस्कवर जा किंवा त्यांना कॉल करा. त्यांना जितक्या लवकर कळवाल, तितके चांगले. एअरलाईनशी संपर्क करणे आवश्यक आहे.

तुमची फ्लाईट का चुकली हे शांतपणे आणि स्पष्टपणे संबंधित अधिकाऱयांना समजावून सांगा. तुम्हाला पुढील उपलब्ध फ्लाईटमध्ये तिकीट देऊ शकते का हे विचारा.

एअरलाईनमुळे फ्लाईट चुकली असल्यास ते तुम्हाला पुन्हा तिकीट देऊ शकतात. अन्यथा, इतर एअरलाईन्सच्या पुढील फ्लाईट्सचा विचार करा.तुमच्याकडे प्रवास विमा असल्यास फ्लाईट चुकल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी तुम्हाला विमा भरपाई मिळू शकते. हे जाणून घेण्यासाठी तुमच्या पॉलिसीचे नियम तपासा.