दिल्ली बॉम्बस्फोटातून दहशतवाद्यांचे बहुराज्यीय नेटवर्क उघड

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्पह्टाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. हा एक मोठ्य़ा दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा भाग होता. यात दहशतवाद्यांचे बहुराज्यीय नेटवर्क, हँडलर्सची साखळी आणि अनेक हल्ले करण्याची दहशतवाद्यांची तयारी असल्याचे उघड झाले आहे.

तपास यंत्रणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट घडविणारा उमर आणि मुझम्मिल यांचे हँडलर वेगवेगळे होते. मंसूर आणि हाशिम अशी त्यांची नावे असून त्यांना इब्राहिम नावाचा हँडलर नियंत्रित करीत होता. टेरर मॉडय़ूलच्या संपूर्ण हालचालींवर इब्राहिमची नजर होती. डॉक्टर टेरर मॉडय़ूलचा प्रत्येक दहशतवादी वेगवेगळ्या हँडलर्सच्या संपर्कात होता. त्यांच्यावरही एक सुपरवायझर असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.