
पालघर येथील साधू हत्याकाडांतील आरोपीला आणि ड्रग्ज तस्कराला पक्षात प्रवेश देणाऱ्या भाजपचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा निषेध करत पक्षप्रवेश केलेल्या या आरोपींची भाजपने तत्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आली आहे.
भाजपच्या बेगडी हिंदुत्वाच्या निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, राजेंद्र शिंदे, मकरंद पेटकर, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका अमृत पठारे, मुकुंद चव्हाण, संदीप गायकवाड, विलास सोनावणे, शशिकांत पापळ, संतोष भुतकर, दिलीप पोमण, रोहित गलांडे, गणेश घोलप, राहुल आलमखाने, रोहित लगाडे, नागेश खडके, राहुल शेडगे, ज्ञानंद कोंढरे, राजेंद्र आवारे, धनंजय देशमुख, परेश खांडके, आदित्य काटे, नितीन निगडे, राजेंद्र शहा, योगेश खरात, संजय वाल्हेकर, महेश कदम, शिवाजी मेलेकरी, वीरेश अडागळे, नितीन दलभंजन, सुनील हळंदे, राहुल शिंदे, दत्तात्रय करपे, रमेश लडकत, अमृता गायकवाड, सीमा मगर, संजय वाल्हेकर, संजय लोहोट, नीलेश पवार, सुनील हळंदे आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, पालघर येथील साधू हत्याकांडानंतर भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गरळ ओकली होती. मात्र, साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरीला भाजपने पक्षात प्रवेश देणे आणि ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे याला तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देणे हे भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे. आरोपींना उमेदवारी देऊन भाजपला काय साध्य करायचं आहे. भाजपचे हिंदुत्व खोटं असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या बेगडी हिंदुत्ववादी भाजपचे डोळे उघडावेत.
कुलूप तोडून आत प्रवेश
सारसबाग परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वारावर असलेले कुलूप तोडून शिवसैनिकांनी स्मारकस्थळी प्रवेश केला. त्यानंतर दूध आणि पाण्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिषेक घालून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘अरे या बेगडी हिंदुत्ववादी भाजपचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला माफ करा
सारसबाग चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची शिवसैनिकांनी स्वच्छता केली. राज्यातील सत्ताधारी भाजप-मिंधे सरकार सावरकरांच्या विचारांची अवहेलना करत असल्याने सरकारचा निषेध करत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला माफ करा,’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
























































