Mukta Barve on Marriage- 46 वर्षांची झाली तरी लग्न नाही? लग्नाच्या प्रश्नांवर मुक्ता स्पष्टचं म्हणाली

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा बहुचर्चित ‘असंभव’हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेने नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गेल्या 25 वर्षांपासून तिने मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भूरळ पाडली. एकीकडे तिच्या कामाचं कौतुक होत असताना दुसरीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तिला अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांवर आता मुक्ताने मौन सोडले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे वयाच्या 46 व्या वर्षी सिंगल आहे. यावरून तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांवर मुक्ताने एका मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य केलं. ती म्हणाली की, मी अशा प्रश्नाची उत्तरेच देत नाही. आणि मुख्य म्हणजे असे प्रश्न मला कोणी समोर येऊन विचारतही नाही. मला तशी गरजही वाटत नाही. कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कोणी का प्रश्न विचारावे आणि त्यावर कोणी का उत्तर द्यावी. केवळ मी समाजमाध्यमात काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारु शकेल असा त्याचा अर्थ नाही.” असे ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली की, पूर्वी मला गंमत म्हणून लग्नाबाबत विचारलं जायचं. तेव्हा स्थळंही यायची आणि आत्ताही येतात. पण त्याची करणे किंवा चर्चेसाठी हा विषय़ असूच नये असं वाटत. कारण वैयक्तिक आयुष्य हे खासगी असतं. माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे. माझं वैयक्तिक आयुष्य मी नेहमीच माझ्या कामापासून लांब ठेवलं. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही, असे ती यावेळी म्हणाली.

मुक्ता बर्वेचा नुकताच ‘असंभव’ हा मराठी सिनेमा प्रदशित झाला आहे. या चित्रपटात मुक्तासह प्रिया बापट, सचित पाटील यांचाही समावेश आहे. सचित पाटीलने सिनेमाचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले आहे. हा एक थरारक सिनेमा आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही मुक्ता लवकरच पदार्पण करेल अशी आशा आहे. कारण मुक्ता आता हिंदीसाठीही ऑडिशन्स देत आहे.

PHOTO मराठी कलाकारांमध्ये 80 च्या रेट्रो लूकची क्रेझ…