IND Vs SA ODI Series – केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची संघात एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेचा हिंदुस्थान दौरा सुरू असून सध्या दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसार सामना सुरू आहे. याच दरम्यान, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल, हार्दिंक पंड्या, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच मराठमोळा खेळडू ऋतुराज गायकवाडची सुद्धा संघात निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 30 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला वनडे सामना रांची येथे खेळला जाणार आहे. दुसरा वनडे सामना 3 डिसेंबर रोजी रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि तिसरा वनडे सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टनमला खेळला जाणार आहे. सध्या दोन्ही संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी झटत आहे. दोन दिवसांचा खेळ झाला असून दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 489 धावा केल्या आहेत. प्रत्तुत्तरात टीम इंडियाने दिवसाअखेर बिनबाद 9 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, ध्रुव जुरेल