
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू याचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. मागील सात महिन्यांत राज्यात तब्बल 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केला आहे. शालेय विद्यार्थी व तरुण पिढीला गुटख्यापासून दूर ठेवण्यासाठी चोरवाटेने गुटख्याची उलाढाल करणाऱ्यांवर ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा निर्णय एफडीएकडून घेण्यात आला आहे. राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनावर बंदी असली तरी परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात गुटखा येतो. त्याला लगाम लावण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.



























































