
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा रविवारी विवाह पार पडणार होता. दुपारी विवाह होण्यापूर्वीच स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी स्मृती मानधना हिचे होणारे पती पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली. त्यामुळे पलाशला तातडीने उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पलाशवर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
























































