
देवदर्शनासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अंडरपासमध्ये कोसळून चार मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघाताची घटना घडली. कर्नाटकातील कोलार येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात कारचा चक्काचूर झाला.
चारही मित्र केरळहून शबरीमालाला चालले होते. यादरम्यान मालूर तालुक्यातील अबेनहल्ली गावात पहाटे 2.15 ते 2.30 च्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले. कार उड्डाणपुलाच्या बाजूच्या बॅरियरला धडकली आणि 100 मीटर अंतरावर एका अंडरपासमध्ये कोसळली. यात चारही मित्रांचा मृत्यू झाला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

























































