भाजपकडून मालवणमध्ये निवडणुकीत पैशाचे वाटप, शिंदे गटाच्या निलेश राणेंचा आरोप

नगरपालिका निवडणूकीत मालवणमध्ये भाजपाकडून पैशाचे वाटप सुरू आहे. असा अरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. मालवण येथे विजय केनवडेकर यांच्या घरात 25 लाख रुपये आले आहेत. ही रक्कम कशासाठी आली त्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. त्यांना रोकड कुठुन आली याचा शोध निवडणुक आयोगाने घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निलेश राणे यांनी आज केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येवून गेलेत तेव्हापासुनच वेगाने ही पैशाची पद्धत सुरु झाली आहे. अजुन 5 ते 6 दिवस जायचे आहेत. एका एका घरात तुम्ही 25-25 आणि 50 लाख अशी रक्कम ठेवलेली मालवणमध्ये 8-10  घरे आहेत. तुम्हाला या निवडणुकीत काय करायचे आहे नेमके? काय धुमाकूळ घालायचा आहे तुम्हाला?, जिह्यामध्ये अशा पद्धतीने निवडणुका कधी होत नव्हत्या..! ही कुठली पद्धत आहे, ही निवडणुकीची पद्धत असेल तर काय निवडणूक लढवून फायदा आहे, असा प्रश्न निलेश राणे यांनी केला.

पैसे असलेल्या घरावर टाकली धाड

विजय केनवडेकर यांच्या घरात फोटो रवींद्र चव्हाण यांचा आहे. रक्कम पकडल्यानंतर निवडणूक आयोगाचे फ्लाईंग स्कॉड आले होते. पोलीस निरीक्षक मारुती जगताप आले होते. भारतीय जनता पार्टीचे पप्या टवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन सर्वत्र वाटत आहेत. विद्या केनवडेकर, बंडय़ा सावंत हा कुडाळचा कार्यकर्ता आहे.  मी धाड टाकली त्यावेळी बेडरूममधील पैशाची बॅग बाहेर टाकण्याच्या तयारी होते, असे निलेश राणे म्हणाले.