
टीम इंडियाचा स्टार माजी खेळाडू आणि कसोटी क्रिकेटचा स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) सकाळच्या सुमारास 30 वर्षी जीत पाबरी घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जीतच्या अचानक जाण्याने पुजारा कुटुंबासह पाबरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जीत पाबरीविरुद्ध पहिल्या पत्नीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीमध्ये केला होता. हा सर्व प्रकार लग्न झाल्यानंतर घडला आणि त्यानंतर लग्न मोडलं होतं. मात्र, या घटनेचा आत्महत्येची संबध असल्याचं अद्याप निश्चीत झालं नसल्याचं पोलीस अधिकारी बी जी चौधरी यांनी सांगितले. India Today ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
जीत पाबरने केलेल्या आत्महत्ये संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, जीत पाबरी घरामध्ये बेशुद्ध अवस्थेथ आढळून आला. त्यानंतर कुटुंबातील काही सदस्यांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. सध्या कुटुंबातील सदस्य बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आत्महत्येच कारण अस्पष्ट असल्यामुळे यावर भाष्य करणं घाईचे ठरेल, असं पोलीस म्हणाले आहेत. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.























































