
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने निर्विवाद वर्चस्व गाजवत 2-0 ने मालिका जिंकला. दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा तब्बल 408 धावांनी दारूण पराभव केला. या पराभवाची सल मनात धगधगत असतानाच मोहम्मद सिरजचा पारा चढलेला पाहायला मिळाला. गुवाहटीवरून हैदराबादला जाताना आलेल्या वाईट अनुभवार त्याने संतप्त ट्वीट करत Air India ला सुनावलं आहे.
गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला गेला. ज्यात टीम इंडियाचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर संघाचा बाघ असलेला मोहम्मद सिराज हैदराबादला जाण्यासाठी एअरपोर्टवर दाखल झाला. त्याने एअर इंडिया फ्लाइट IX 2884 बुक केली होती. वेळापत्रकानुसार 7 वाजून 25 मिनिटांनी विमान उड्डान घेणार होते. मात्र, चार तास झाले तरी विमान रनवेवरून हवेत झेपावले नाही. तसेच एअरलाइनकडूनही ठोस माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मोहम्मद सिराजसह या फ्लाइटने प्रवास करणारे सर्वच प्रवासी चांगलेत संतापले. मोहम्मद सिराजने यांसदर्भात ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला.
सिराज म्हणाला की, “गुवाहाटीहून हैदराबादला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक IX 2884 हे 7.25 वाजता उड्डाण करणार होते. वारंवार पाठपुरावा करूनही एअरलाईनकडून उड्डानासंदर्भात योग्य कारण सांगण्यात आले नाही. विमानाला चार तास उशीर झाला आणि तरीही कोणतीही अपडेट दिली नाही. त्यामुळे आम्ही अडकून पडलो आहोत. विमान कंपनीचा सर्वात वाईट अनुभव आहे. जर ते ठोस पावले उचलत नसतील, तर मी खरोखरच कोणालाही या विमानाने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही.” अशा संतप्त भावना मोहम्मद सिराजने एअर इंडियाला पोस्टमध्ये टॅग करत व्यक्त केल्या आहेत.
Air India flight no IX 2884 from Guwahati to Hyderabad was supposed to take off at 7.25 however there has been no communication from the airline and after repeatedly following up, they have just delayed the flight with no proper reasoning. This has been really frustrating and…
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) November 26, 2025


























































