पोलीस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला अटक

पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या इम्रान अन्सारी ऊर्फ यश डाकोरे या आरोपीला अवघ्या काही मिनिटांत विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यातून पळून गेल्यावर तो टर्मिनल 9 येथील हायड्रॉलिक पार्ंकगच्या कोपऱयात लपून बसला होता. विलेपार्ले पोलीस ठाण्यात घरपह्डीचा गुन्हा नोंद होता. त्या गुह्यात इम्रानचा सहभाग असल्याचे आढळल्याने तो पोलिसांना पाहिजे आरोपी होता. मेघवाडी पोलिसांनी इम्रानला एका गुह्यात अटक केली होती. त्या गुह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने तो आर्थर रोड तुरुंगात होता. न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्याला विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या अटकेची प्रक्रिया पार केल्यावर इम्रानला अंधेरी येथील लॉकअपमध्ये नेले जाणार होते. संधीचा फायदा घेत इम्रानने पळ काढला होता.