व्हाईट हाऊसजवळ गोळीबारानंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय; ‘थर्ड वर्ल्ड’ देशांमधून होणाऱ्या स्थलांतरावर रोख, हिंदुस्थानींनाही बसणार फटका

व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड कर्मचाऱ्यांवर एका अफगाण नागरिकाने गोळीबार केल्याच्या घटनेनंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेची व्यवस्था ‘पूर्णपणे सावरू’ देण्यासाठी ते ‘सर्व थर्ड वर्ल्ड देशांमधून होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबवणार’ आहेत. या निर्णयाचे जगभर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे आणि नोकरी, शिक्षण तसेच आपल्या देशांतील छळातून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत येणाऱ्या लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने तांत्रिकदृष्ट्या प्रगती केली असली तरी, त्यांच्या स्थलांतर धोरणाने ‘ती प्रगती आणि अनेक लोकांसाठी राहणीमान खालावले आहे.’

ट्रम्प म्हणाले, ‘मी अमेरिकेची व्यवस्था पूर्णपणे सावरू देण्यासाठी सर्व थर्ड वर्ल्ड देशांमधील स्थलांतर कायमस्वरूपी थांबवेन. बायडेन सरकारच्या काळात अवैध प्रवेश करणाऱ्या आणि अमेरिकेसाठी अनावश्यक किंवा आपल्या (अमेरिकेवर) देशावर प्रेम करू न शकणाऱ्या व्यक्तींना बाहेर काढेन. तसेच, अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांना मिळणारे सर्व सरकारी लाभ आणि अनुदान समाप्त करेन. देशातील शांतता बिघडवणाऱ्या स्थलांतरितांचे नागरिकत्व रद्द करेन आणि जो कोणी सार्वजनिक भान बाळगणार नाही, सुरक्षेला धोका ठरले किंवा पाश्चात्य संस्कृतीशी जुळणारा नसेल अशा परदेशी नागरिकाला हद्दपार करेन’.

‘केवळ ‘रिव्हर्स मायग्रेशन’ (Reverse Migration) द्वारेच ही परिस्थिती पूर्णपणे ठीक होऊ शकते. याव्यतिरिक्त, सर्वांना थँक्सगिव्हिंगच्या शुभेच्छा, त्या लोकांव्यतिरिक्त जे द्वेष करतात, चोरी करतात, खून करतात आणि अमेरिका ज्या मूल्यांसाठी उभा आहे ते सर्व नष्ट करतात – तुम्ही जास्त काळ येथे राहणार नाही!’, असा इशारा देखील त्यांनी पुढे दिला आहे.

वॉशिंग्टन गोळीबार आणि सैनिकाचा मृत्यू

व्हाईट हाऊसपासून अवघ्या काही अंतरावर झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांच्याकडून स्थलांतरितांसंदर्भात ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. एका हल्लेखोराने दोन नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळीबार केला. सारा बेकस्ट्रॉम आणि अँड्र्यू वुल्फ – अशी त्यांची नावे असून २० वर्षीय बेकस्ट्रॉम यांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमधून आलेला २९ वर्षीय रहमानुल्लाह लकनवाल याची संशयित म्हणून ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेने २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर तो अमेरिकेत स्थलांतरित झाला होता. गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Trump Vows to ‘Permanently Pause Migration from Third World Countries’ After DC Shooting

Following the fatal shooting of a National Guard member near the White House by an Afghan national, Donald Trump announced plans to permanently halt migration from all ‘Third World Countries’ and deport non-compatible migrants to allow the US system to ‘fully recover.’

Keywords: Donald Trump, Third World Migration, Immigration Pause, DC Shooting, Sarah Beckstrom Death, Rahmanullah Lakanwal, Reverse Migration, White House Shooting, US Immigration Policy, Truth Social