
मुंबईचा युवा तडफदार आक्रमक फलंदाज आणि टीम इंडियाचा 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे Syed Mushtaq Ali Trophy मध्ये गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला आहे. पहिल्या सामन्यात धुवांधार फटकेबाजी केल्यानंतर रविवारी (30 डिसेंबर 2025) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही त्याने त्याच थाटात गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 59 चेंडूंमध्ये नाबाद 104 धावांची शतकीय खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रविवारी मुंबई आणि आंध्र प्रदेश यांच्यात सामना खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आंध्रप्रदेशने 7 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आणि मुंबईला जिंकण्यासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना आयुष म्हात्रेने 59 चेंडूंचा सामना केला आणि 9 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 104 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (31*) सोबतीने दमदार भागीदारी केली आणि संघाला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.
‘सेंच्युरी किंग’ विराट कोहली; सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडला
आयुष म्हात्रेची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुरुवात खराब झाली होती. रेल्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 18 धावांवर तो बाद झाला. मात्र, त्यानंतर विदर्भविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने 53 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 110 धावांची नाबाद खेळी केली.


























































