
छोट्या छोट्या आजारपणात डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून औषधे घेणे धोकादायक ठरून शकते. अनेकजण छोट्या आजारपण जसे सर्दी,पात खोकला यावर जाहिरातीत दिसणारी किंवा स्वतःला माहिती असणारी औषधे घेतात. मात्र, त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, विशेषतः अँटीबायोटिक्स चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात घेतल्यास अँटीबायोटिक रेझिस्टन्ससारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
स्वतःहून औषध घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जर डोकेदुखी असेल तर अनेकजण डिस्प्रिन घेतात, जर ताप असेल तर डोलो घेतात, जर सर्दी, डोकेदुखी किंवा फ्लू असेल तर कॉम्बिफ्लॅम गोळ्या घेतात. सध्या स्वतःच मनाने औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. खोकला, सर्दी किंवा घसा खवखवणे यासह अनेकजण तापासारख्या किंवा साथीच्या रोंदावरही स्वतःच्या मनाने औषधे घेतात. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला घेणेही टाळतात. डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी लोक स्वतःच्या आजारांवर उपचार करतात, परंतु असे केल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते. कारण ओव्हर-द-काउंटर औषधे अनेक प्रकरणांमध्ये शरीरावर प्रतिकूल प्रतिक्रिया देऊ शकतात, ज्यामुळे शरीराला गंभीर नुकसान होऊ शकते.
स्वतःहून औषध घेणे किती धोकादायक आहे?
लोक अनेकदा जुनी औषधे वापरतात किंवा दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेतात, ज्यामुळे शरीराला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्याता असते. अँटीबायोटिक्स ही शेड्यूल एच किंवा एच१ औषधे आहेत आणि ती फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच वापरली पाहिजेत.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि ओटीसीवरील सल्ल्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांना डॉक्टरची गरज नाही. सर्दी, खोकला किंवा घसा खवखवण्यासाठी औषधे मेडिकल स्टोअरमधून खरेदी केली जातात. शिवाय, बरेच लोक स्वतःवर औषधोपचार करतातच पण इतरांनाही सल्ला देतात की, मला या औषधाने बरे वाटले तुम्हीही ते घ्या’. मात्र, असे करणे आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे आजार निर्माण करू शकतात.
अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर
“बहुतेक लोक विषाणूजन्य संसर्गासाठीही अँटीबायोटिक्स घेण्यास सुरुवात करतात, जरी अँटीबॅक्टेरियल एजंट विषाणूंना मारू शकत नाहीत. विषाणूजन्य सर्दी, विषाणूजन्य न्यूमोनिया, घशातील संसर्ग किंवा घसा खवखवण्यावर उपचार करण्यात अँटीबायोटिक्सची कोणतीही भूमिका बजावत नाही. अशी औषधे घेणे हानिकारक असू शकते. या औषधांचा चुकीचा वापर अँटीबायोटिक प्रतिरोध वाढवतो, म्हणजेच ती औषधे तुमच्या शरीरात काम करु शकणार नाहीत. सर्वात जास्त वापरली जाणारी औषधे शेड्यूल एच आणि शेड्यूल एक्स श्रेणींमध्ये येतात, म्हणजेच ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत घेऊ नयेत.




























































