
खासदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतील खेळ महोत्सवाच्या फुटबॉल स्पर्धेत फिनिक्स एफसी आणि अॅनासेलेटो एंजल्स या संघांनी बाजी मारली. फिनिक्स फुटबॉल क्लबने पुरुष गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर महिला गटात अॅनासेलेटो एंजल्स संघाने प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवत अजिंक्यपद पटकावले. विजेत्या संघांना खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

































































