
1 जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र जसे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे लग्न प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
2 मॅरेज सर्टिफिकेट हरवले तर काय करावे, हे बऱयाच जणांना कळत नाही. त्यामुळे सर्वात आधी जेथून हे सर्टिफिकेट मिळाले आहे, त्या ठिकाणी जाऊन हरवल्याची माहिती द्या.
3 जिथे तुम्ही लग्न नोंदवले होते, त्या कार्यालयात संपर्प साधा. यामध्ये रजिस्ट्रार कार्यालय, मंदिर किंवा आर्य समाज मंदिर असू शकते. डय़ुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी अर्ज करा.
4 अर्ज करताना सोबत ओळखीचा पुरावा म्हणजेच आधारकार्ड किंवा पासपोर्ट, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, लग्न झाल्याची तारीख आणि ठिकाण सिद्ध करणारे कागदपत्रे जोडा.
5 अर्ज सादर करताना लागू असलेले शुल्क भरावे लागेल. अर्ज आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला डय़ुप्लिकेट विवाह प्रमाणपत्र मिळेल.




























































