
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
अमेरिका भारताला जावेलिन क्षेपणास्त्र प्रणाली (FGM-148) आणि एक्सकॅलिबर प्रोजेक्टाईल (M982) विकत आहे. अमेरिका-भारत संरक्षण करार भारतीय लष्कराच्या सिद्धतेला नवी दिशा देणारा एक महत्त्वाचा सामरिक निर्णय आहे. जावेलिनमुळे पायदळाला रणगाडय़ांचा मुकाबला करण्याची स्वतंत्र आणि गतिमान क्षमता मिळेल, तर एक्सकॅलिबरमुळे तोफखान्याला अभूतपूर्व अचूकता आणि श्रेणी प्राप्त होईल. या प्रणालींच्या समावेशामुळे भारतीय लष्कराला आपले युद्ध लढण्याचे तत्त्वज्ञान (Warfare Doctrine) अधिक आधुनिक आणि नेटवार्ंकग-आधारित (Network-Centric) बनवता येईल.
जावेलिन ही एक पोर्टेबल (वाहून नेण्यायोग्य), रणगाडा-विरोधी (Anti-Tank Guided Missile – ATGM) प्रणाली आहे. डागल्यानंतर ऑपरेटरला लगेच सुरक्षित स्थानी जाता येते. या ‘लॉक-ऑन’ क्षमतेमुळे ऑपरेटरचे प्राण वाचतात.सृस शिवाय इन्फ्रारेड इमेजिंग साधने वापरून लक्ष्य भेदणे शक्य होते. तसेच रणगाड्याच्या छतावर (Top) हल्ला करता येतो. रणगाड्याचा सर्वात कमकुवत भाग म्हणजे छत असते. बंकर किंवा इमारती नष्ट करण्यासाठी सरळ हल्लादेखील शक्य होतो. चीनच्या सीमेवर (LAC) आणि पाकिस्तानच्या सीमेवर (LoC) डोंगराळ प्रदेशात तैनात असलेल्या भारतीय पायदळ (Infantry) तुकडय़ांसाठी हे अत्यंत प्रभावी आहे. पोर्टेबल असल्याने ते वेगाने तैनात केले जाऊ शकते. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या आणि आधुनिक रणगाडा ताफ्याला (उदा. PLA चे ऊब्ज 99, पाकिस्तानचे T-80UD) तोंड देण्यासाठी हे एक अत्यंत आवश्यक आणि आधुनिक प्रत्युत्तर आहे. जावेलिनने अनेक युद्धभूमीवर आपली क्षमता सिद्ध केली आहे (उदा. युव्रेन युद्धात रशियन रणगाडय़ांविरुद्ध याची प्रचंड परिणामकारकता दिसून आली आहे.)
एक्सकॅलिबर प्रोजेक्टाईल (M982 Excalibur) तोफगोळ्याचे महत्त्व
एक्सकॅलिबर हा एक प्रोजेक्टाईल (तोफगोळा) असून त्याला स्मार्ट बॉम्बप्रमाणे ‘स्मार्ट प्रोजेक्टाईल’ म्हटले जाते. हे तोफेतून डागले जाते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (INS) वापरून मार्गदर्शन होत असल्याने लक्ष्य अचूकपणे भेदले जाते. पारंपरिक (Un-Guided) तोफगोळय़ांपेक्षा याची अचूकता शेकडो पटींनी जास्त आहे. हे लक्ष्य चुकण्याची शक्यता कमी करते. पारंपरिक तोफगोळ्यांच्या तुलनेत याची मारा करण्याची क्षमता (Range) खूप जास्त आहे, ज्यामुळे हे दूरचे लक्ष्यही अचूकपणे भेदू शकते.
एक्सपॅलिबरचे सामरिक महत्त्व
सीमेवरील शत्रूचे बंकर, कमांड पोस्ट्स आणि शस्त्रसाठा असलेले ठिकाणे यांचा अचूक भेद घेण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. उच्च अचूकतेमुळे नागरी वस्त्या आणि गैर-लष्करी ठिकाणांचे नुकसान (Collateral Damage) टळते. हे गोळे भारतीय लष्कराच्या 125 mm आणि 155 mm च्या बोफोर्स, एम-777 हॉवित्झर आणि ‘धनुष’ यांसारख्या तोफ प्रणालींसोबत वापरले जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय लष्कराला मोठय़ा प्रमाणात गोळीबार करण्याऐवजी ‘प्रत्येक गोळी, एक लक्ष्य’ (One Shot, One Kill) या तत्त्वावर काम करण्याची क्षमता मिळेल. पूर्व लडाखसारख्या डोंगराळ प्रदेशात, एक्सकॅलिबरमुळे भारतीय तोफखान्याची क्षमता (Artil-lery Power) अनेक पटींनी वाढेल. जावेलिनमुळे पायदळाला चिनी रणगाडय़ांचा धोका कमी करण्यास मदत मिळेल. भविष्यातील संरक्षण करारांसाठी हा करार तंत्रज्ञान हस्तांतरण आााणि संयुक्त उत्पादनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाया तयार करू शकतो.
भू-राजकीय महत्त्व आणि भागीदारी
या करारामुळे अमेरिका भारताला ‘प्रमुख संरक्षण भागीदार’ (Major Defence Partner) मानत असल्याची पुष्टी होते आणि उच्च तंत्रज्ञान प्रणाली पुरवण्याची अमेरिकेची तयारी दिसून येते. पारंपरिक रशियन शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी करून पाश्चात्त्य आणि आधुनिक शस्त्रs ताफ्यात समाविष्ट करण्याची संधी यामुळे आपल्याला मिळत आहे..
MH-60R हेलिकॉप्टर समर्थन करार
भारत सरकारने अमेरिकेसोबत MH-60R (रोमियो) मल्टिरोल हेलिकॉप्टरच्या ताफ्यासाठी केलेल्या सुमारे रुपयांच्या 7,995 कोटीच्या ‘फॉलोऑन सपोर्ट’ कराराला सामरिकदृष्टय़ा मोठे महत्त्व आहे. हा करार भारतीय नौदलाची ऑपरेशनल सज्जता आणि तांत्रिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आहे. पाच वर्षांसाठी ‘फॉलोऑन सपोर्ट’ आणि ‘फॉलोऑन सप्लाय सपोर्ट’ मिळाल्यामुळे MH-60R हेलिकॉप्टरच्या ताफ्याची परिचालन उपलब्धता (Operational Availability) आणि देखभाल क्षमता (Maintainability) कायम राहील. याचा अर्थ हेलिकॉप्टर कमीतकमी वेळेसाठी निष्क्रिय राहतील आणि मिशनसाठी जास्तीत जास्त वेळेस तयार असतील.
MH-60R हे पाणबुडीविरोधी युद्ध (Anti-Submarine Warfare – ASW) आणि पृष्ठभागावरील युद्ध (Anti-Surface Warfare – ASuW) यांसारख्या गंभीर कार्यांमध्ये अत्यंत प्रभावी आहेत.
ही हेलिकॉप्टर विखुरलेल्या ठिकाणांहून तसेच नौदलाच्या लढाऊ जहाजांवरून (उदा. फ्रिगेट्स, विनाशिका आणि विमानवाहू युद्धनौका) ऑपरेट करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे नौदलाच्या युद्धगटांची (Carrier Bat-tle Groups) लढाऊ क्षमता कैक पटींनी वाढते. या करारामुळे अमेरिका भारताला ‘प्रमुख संरक्षण भागीदार’ मानत असल्याचे सिद्ध होते. अशा उच्च तंत्रज्ञान प्रणालीसाठी मिळणारा पाठिंबा भारताच्या भू-सामरिक स्थानाला बळकट करतो.
चीनची पीएलए नेव्ही (PLAN) वेगाने आपला पाणबुडी ताफा वाढवत आहे आणि हिंदी महासागर क्षेत्रात त्यांची उपस्थिती वाढत आहे. MH-60R ची उत्कृष्ट ASW क्षमता भारतीय नौदलाला चिनी पाणबुडय़ा (विशेषतः अणुशक्तीवर चालणाऱया) शोधण्यात आणि त्यांचा मागोवा घेण्यात निर्णायक मदत करेल. चीनच्या मोठय़ा युद्धनौका आणि विनाशिकांच्या हालचालींवर जहाजांवरून आणि किनारी तळांवरून सतत पाळत ठेवण्यासाठी MH-60R आवश्यक आहेत. चीनच्या नौदलाच्या वाढत्या आक्रमकतेसमोर, MH-60R ची तैनाती भारताला आवश्यक सामरिक समतोल राखण्यास मदत करेल.




























































