
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्री वळणाजवळील दरीत खासगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाला. आज पहाटे साडे 4 वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही बस दरीत कोसळली. या अपघातात 37 प्रवासी जखमी झाले असून त्यातील आठ प्रवासी गंभीर आहेत. अपघातग्रस्त बस 1 डिसेंबर 2025 रोजी नेपाळ येथून 110 महिला-पुरुष प्रवाशांना घेऊन निघाली होती. आंबा घाटातील चक्री वळणाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस सुमारे 50 फूट दरीत कोसळली. अपघाताचे वृत्त कळताच लांजा व देवरुख पोलिसांनी जखमींना बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी आणले.


























































