तपोवनातील वृक्षांची कत्तल करू नका, मनसे हायकोर्टात

नाशिकमध्ये होणाऱया कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला शिवसेनेसह पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत असतानाही झाडे तोडण्याचा रेटा निर्दयी सरकारने लावून धरला आहे या विरोधात कायदेशीर दाद मागण्यासाठी मनसे सरसावली असून तपोवनातील वृक्षांची कत्तल करू नका अशी मागणी करत मनसेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तपोवनात साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड, पुनर्रोपण याविरोधात मनसेने जनहित याचिका दाखल केली असून महापालिकेला तपोवनातील झाडे तोडण्यास मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसे शहर उपाध्यक्ष ऍड. नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली तपोवनातील झाडे तोडू नयेत, प्रस्तावित प्रदर्शनी केंद्राच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अथवा तो रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात लवकरच सुनावणीची शक्यता आहे.