
शालेय शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातून उपक्रमशील आदर्श शिक्षकांची निवड करत त्यांना ‘आयडॉल’ म्हणून सन्मानित करण्यात आले. मुंबई जिह्यातून या उपक्रमासाठी 36 शिक्षकांची निवड केली आहे. त्यात जोगेश्वरीतील श्रमिक विद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्नेहा अजित चव्हाण यांची निवड झाली आहे.

























































