
देशभरातील 150हून जास्त कलाकार, 4 हजार 500 कलाकृतींचा समावेश असलेला कला स्पंदन आर्ट फेअर वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आजपासून सुरू झाला. देशभरातील नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कला स्पंदन आर्ट फेअरचे संस्थापक व क्युरेटर सुदीप चक्रवर्ती, सुप्रसिद्ध टीव्ही व बॉलिवूड अभिनेत्री एकता बी.पी. सिंह, शक्तिमान टीव्ही मालिकेचे लेखक ब्रिजमोहन पांडे, सुप्रसिद्ध कलाकार रामजी शर्मा उपस्थित होते. हे प्रदर्शन 7 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत पाहता येणार आहे.



























































