
गेल्या काही दिवसांमध्ये नवले पुलांवर झालेल्या भीषण अपघातांमुळे पुण्याचं नावं अपघातांच्या बाबतीत सध्या चर्चेत आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्यातील लोणावळ्यात टेम्पो आणि एका कारचा धडकी भरवणारा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ शनिवारी (06 डिसेंबर 2025) सकाळी हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पो आणि कार समोरासमोर धडकल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे, तर टेम्पोच्या उजव्या बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ गोव्याचे असलेल्या मयुर वेंगुर्लेकर (24) आणि योगेश सुतार (21) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही गोव्याहून लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. अपघातानंतर दोघांचेही मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून ट्रक चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

























































