असं झालं तर… पीएफचे पैसे काढता येत नसतील तर

पीएफचे पैसे काढण्यासाठी आधीच्या तुलनेत सोपे झाले आहे, परंतु कधी कधी काही कारणास्तव पैसे विथड्रॉ होत नाहीत. असे नेमके का होते हे जाणून घेणे गरजेचे आहे.

पीएफचे पैसे काढायचे असतील यूएएन नंबर, आधार, पॅन, बँक खाते ईपीएफओ पोर्टलवर अपडेटेड आहे का ते तपासा. केवायसी नसल्यास पैसे काढता येत नाहीत.

तुमचा यूएएन नंबर ऑक्टिव असणे अत्यंत गरजेचे आहे. तो नंबर सध्याच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासून पाहा. असे असेल तर पैसे काढता येतील.

ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करून क्लेम स्टेटस ट्रक करून स्टेटस तपासू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्लेमची सध्याची काय स्थिती आहे हे समजेल.

नोकरी सोडल्यानंतर 36 महिन्यांनंतर खाते निष्क्रिय होते. त्यावर व्याज मिळणेही थांबवले जाते. त्यामुळे नोकरीवर नसल्यास पीएफ काढा किंवा नव्या खात्यावर ट्रान्सफर करा.