
डिजिटल पेमेंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यासाठी इंटरनेट बॅकिंग सुविधा असलेले बँक खाते आणि यूपीआय आयडी लागतो. जर कोणाकडे हे दोन्ही नसतील तर?
अशा लोकांना ‘भीम’ ऍप द्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते. भीम ऍपमध्ये ‘फुल डेलिगेशन’ नावाची एक नवी सुविधा नुकतीच सुरू केली आहे.
ज्याच्याकडे खाते किंवा यूपीआय आयडी नाही, असे सेकंडरी युजर्स ते वापरू शकतात. त्याचे नियंत्रण भीम ऍपच्या मूळ युजरकडे असते.
भीम ऍपमध्ये यूपीआय सर्कल सेक्शनमध्ये जाऊन सेकंडरी युजरचा मोबाईल क्रमांक टाकावा. तेथे त्याला नवा यूपीआय आयडी देता येतो.
खर्चाची मर्यादा सेट करून सेकंडरी युजर जोडावा. त्यानंतर त्याची कागदपत्रे सबमिट करावा. या खर्चाचा कालावधी निवडा. आपले बँक खाते निवडून पुढे डेलिगेशनला मंजुरी द्या.


























































