
अमेरिकेतील स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स ट्रोल झाले आहेत. नेटकऱ्यांनी वान्स यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून त्यांच्यावर टीका केली आहे. “हिंदुस्थानी वंशाची तुमची पत्नी आणि मुलांना हिंदुस्थानात कधी पाठवणार?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण अवलंबले आहे. स्थलांतरितांवर विविध निर्बंध लागू केले जात आहेत. ट्रम्प यांच्या बाजूने बोलणारे मंत्री आणि पाठीराखे या धोरणाचे समर्थन करत आहेत. उपाध्यक्ष वान्स यांनीही स्थलांतरितांविरोधात नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली होती. “स्थलांतरितांची वाढती संख्या म्हणजे अमेरिकन नागरिकांच्या स्वप्नांची चोरी आहे,” असे त्यांनी म्हटले होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
नेटकरी म्हणाले — “ज्यांची स्वतःची पत्नी स्थलांतरित आहे, ते कोणत्या तोंडाने विरोध करतात?”, “तुमची पत्नी आणि मुलेही अमेरिकन नागरिकांची स्वप्ने चोरत आहेत का?”, “त्यांना भारतासाठी फ्लाइट बुक कराल तेव्हा आम्हालाही सांगा”, “तुम्ही तर ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध केला पाहिजे.”
























































