हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायला हवी?

हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. कोमट पाण्याने केस धुणे केसांसाठी चांगले आहे कारण ते टाळूवरील घाण आणि तेल प्रभावीपणे काढून टाकते, परंतु खूप गरम पाण्याने केस धुणे हानिकारक असू शकते. खूप गरम पाणी टाळू कोरडे करू शकते, केस कमकुवत करू शकते आणि कोंडा होऊ शकते.

आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?

हिवाळ्यात कोंडा ही देखील एक सामान्य समस्या आहे. कोंडा दूर करण्यासाठी गरम तेलाची थेरपी खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, नारळाचे तेल गरम करा आणि ते तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. नंतर गरम पाण्यात एक टॉवेल बुडवा, पाणी पिळून घ्या आणि कोमट टॉवेल तुमच्या डोक्याभोवती पगडीसारखा गुंडाळा. ते ५ मिनिटे तसेच राहू द्या. कोमट टॉवेल ३ किंवा ४ वेळा गुंडाळा. तेल रात्रभर तसेच राहू द्या.

मसूर डाळ मधुमेहींनी आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा

हिवाळ्यात केसांना नियमित कंडिशनिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. केसांचे कंडिशनर आणि हेअर सीरम केसांना मऊ मुलायम करण्यास, चमक वाढविण्यास आणि पोत सुधारण्यास मदत करतात. कंडिशनिंग केसांना संरक्षण देखील देतात. शॅम्पू केल्यानंतर, क्रिमी कंडिशनर लावा. केसांच्या टोकांसह केसांना थोड्या प्रमाणात हलक्या हाताने मसाज करा. ते दोन मिनिटे तसेच राहू द्या आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

हिवाळ्यात केसांना पोषण देण्यासाठी आणि चमक परत मिळवण्यासाठी घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात. यासाठी एक अंडे, दोन चमचे एरंडेल तेल, एक लिंबाचा रस आणि एक चमचा शुद्ध ग्लिसरीन मिसळा आणि तुमच्या केसांना लावावे. यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.