
गोव्यातील नाईट क्लबमध्ये आग लागून २५ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक असलेल्या लुथ्रा बंधूंना (Luthra Brothers) परत आणण्याची प्रक्रिया (Deportation Process) थायलंडमध्ये सुरू झाली आहे.
थायलंडमध्ये कारवाई
थायलंडच्या अधिकाऱ्यांनी लुथ्रा बंधूंना (सौरभ आणि गौरव लुथ्रा) आता फुकेत येथून बँकॉक (Bangkok) येथे हलवले आहे. बँकॉक येथे त्यांना हिंदुस्थानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल.
गेल्या रविवारी क्लबमध्ये आग लागल्यानंतर लुथ्रा बंधूंनी तातडीने थायलंडला पळ काढला होता. गोवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस आणि इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती, तसेच त्यांचे पासपोर्टही निलंबित केले होते. या कारवाईनंतर आता त्यांना हिंदुस्थानमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





























































