
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ताटकळत ठेवले. मात्र इतका वेळ वाट पाहिल्यानंतर शरीफ थेट पुतिन यांच्या बैठकीत शिरले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन आणि शरीफ यांची भेट ठरली होती. या नियोजित बैठकीला उशीर झाल्याने शरीफ थेट चक्क रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप रेसेप एर्दोगन यांच्यामध्ये बंद दाराआड सुरू असलेल्या बैठकीत शिरले. अनेकांनी शरीफ यांच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे.



























































