
सोशल मीडियावर डान्स करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ टाकण्यात येतात. असाच एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या काकांनी एका घरगुती कार्यक्रमात ‘लैला ओ लैला’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. कदाचित एखाद्या लग्नाच्या वेळी त्यांनी कुटुंबीयांसमोर हा डान्स केलेला असावा. या काकांनी गाण्यातील संगीताच्या तालावर असा काही ठेका धरला, की पाहणाऱया प्रत्येकाने तोंडात बोटे घातली. काकांचे वय साधारणतः 55 च्या आसपास असेल. अवघ्या 5 दिवसांमध्ये हा व्हिडीओ आतापर्यंत 26 लाख वेळा पाहण्यात आला आहे.




























































