Ratnagiri news – एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या दोन नौका पकडल्या

एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या दोन नौकांना पकडण्यात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाला यश आले आहे.पकडलेल्या दोन्ही नौका मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या ताब्यात असून नौकेवरील एलईडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात रत्नागिरी समोर प्रविण काशीनाथ दळवी यांची हर्षाली नौका आय एन डी एमएच ४ एमएम १४१२ ही नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत आढळल्याचे आढळून आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी कारवाई करत नौका पकडली. त्याचबरोबर पूर्णगड समुद्रात मोहसीन अब्दुल गफूर वस्ता यांची नौका महिन आय एम डी एमएच ४ एमएम ५०९१ हि नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत असल्याचे आढळून आले.

मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत यांनी ही नौका पकडली. नौकेवरील एलईडी दिवे व अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.