
दरवर्षी साजरा होणारा ‘पेन्शनर्स डे’ समारंभ बुधवारी संध्याकाळी 4 वाजता दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाटय़गृहातील राजर्षी शाहू सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम गवळी यांनी दिली.
‘पेन्शनर्स डे’ या समारंभाला माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुभाष आवटे, अभिदान व लेखा अधिकारी विलास गांगुर्डे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे प्रमुख अतिथी आहेत. ‘पेन्शनर्स डे’चा आणखी एक समारंभ बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन आणि शिधावाटप सेवा निवृत्त कर्मचारी संघटना यांनी संयुक्तरित्या शनिवार, 27 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता गोराई रोड, जुनी एमएचबी कॉलनी, श्री दत्त सेवा समिती, औदुंबर कृपा, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित केला आहे. बोरिवलीच्या या समारंभाला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, लेखा व कोषागारे सहसंचालक रश्मी नांदिवडेकर, माजी शिधावाटप उपनियंत्रक मनोहर कडवे हे प्रमुख अतिथी आहेत.






























































