ब्राझीलमध्ये वादळी वाऱ्याने कोसळला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’

ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरातील हवन मोगास्टोअरच्या बाहेर मोठय़ा दिमाखात उभा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळल्याची घटना घडली. ब्राझीलमध्ये आलेल्या वेगवान वाऱयामुळे अवघ्या काही सेकंदांत हा पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवन मेगास्टोअरच्या बाहेर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा 24 मीटर उंचीचा पुतळा उभा होता. या ठिकाणी 90 किमी ताशी वेगाने वारे वाहू लागल्याने हा पुतळा कोसळला. हा पुतळा 2020 मध्ये उभा करण्यात आला होता. हा स्टॅच्यू कोसळण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वी स्टॅच्यूच्या जवळपास असणारी वाहने बाजूला करण्यात आली होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.