
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या उभय संघांमध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथा सामना आज (17 डिसेंबर 2025) खेळला जाणार आहे. याच दरम्यान ICC टी20 फलंदाजांच्या क्रमवारीची ताजी आकडेवारी समोर आली आहे. क्रमवारीत टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर तिलक वर्माला सुद्धा क्रमवारीत फायदा झाला आहे.
आयसीसी फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत 909 गुणांच्या कमाईसह आपला पहिल्या क्रमांकाच मुकूट कायम ठेवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फिल सॉल्ट (849), तिसऱ्या क्रमांकावर (779) आणि चौथ्या क्रमांकावर तिलक वर्माने झेप घेतली आहे. तिलक वर्माने दोन स्थानांनी उडी मारली आणि 774 गुणांसह चौथे स्थान पटकावले. या सर्व क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला दणका बसला आहे. सूर्यकुमार यादवच्या क्रमवारीत जोरदार घसरण झाली असून तो सध्या 669 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवची बॅट तळपली तर त्याला क्रमवारीत फायदा होईल. जर त्याची बॅट शांत राहिली, तर सूर्यकुमार यादव टॉप 10 मधून बाहेर फेकला जाईल.





























































