…ही आहे भाजपाची नैतिकता, बजाओ ताली..! रोहित पवार यांचे भाजपवर टिकास्त्र

जामखेडमध्ये वॉर्ड क्र. 11 मधील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा सख्खा नातेवाईक सागर टकले याच्या जामखेड पॅलेस या हॉटेलवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन कामगारांना अटक केली आणि पाच महिलांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हीच आहे का भाजपची नैतिकता असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गल्लीतलं भांडण दिल्लीत नेणारे प्रा. राम शिंदे आणि पावलोपावली नैतिकतेच्या गप्पा झोडणारा भाजप अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांना आणि महिलांना ‘माल’ अशी लज्जास्पद भाषा वापरणाऱ्यांना कसे पोसतात, त्याचा आणखी एक पर्दाफाश. जामखेडमध्ये वॉर्ड क्र. 11 मधील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा सख्खा नातेवाईक सागर टकले याच्या जामखेड पॅलेस या हॉटेलवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन कामगारांना अटक केली आणि पाच महिलांना ताब्यात घेतलं. ही आहे भाजपाची नैतिकता. बजाओ ताली..! असे ट्विट केले आहे. शिवाय त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत.