किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार

किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. किंगफिशरच्या माजी कर्मचाऱयांना दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीने किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱयांसाठी 312 कोटी रुपये लिक्विडेटरला हस्तांतरित केले आहेत.

चेन्नई कर्ज वसुली न्यायाधिकरणाने परतफेड मंजूर केल्यानंतर ही रक्कम किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱयांना वाटण्यासाठी अधिकृत लिक्विडेटरकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ईडीने आधी एसबीआयला परत केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून निधी जमा करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाला दिले होते. सीबीआयने विजय मल्ल्याविरोधात कर्ज फसवणुकीचा खटला दाखल केल्यानंतर मल्ल्या परदेशात पळून गेला होता. त्यानंतर ईडीने किंगफिशर एअरलाईन्सविरोधात मनी लॉण्डरिंगचा खटला सुरू केला होता. ईडीने जप्त केलेल्या मालमत्ता कन्सोर्टियम बँकांना परत केल्या. त्या विक्रीतून एकूण 14 हजार 132 कोटी रुपये मिळाले.