
संत नामदेवांचा मुलगा नाराची पत्नी संत लाडाई. संत लाडाईंचे जन्मस्थळ, काळ उपलब्ध नाही. पण त्या 14 व्या शतकातील आहेत हे निश्चित. संत तुकाराममहाराज यांनी त्यांच्या नावावर दीड कोटी अभंग नोंदवले आहेत. आज त्यांचे फक्त तीन अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेवांच्या समाधीनंतर त्या हयात होत्या. त्या प्रसंगाचा उल्लेख एका अभंगात त्यांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या समवेत कुटुंबातील सर्व जण निर्वाणपदी पोहोचले, अशी समजूत आहे. पांडुरंगाच्या भेटीची तळमळ, प्राप्त संसारातील दुःख याची जाणीव संत लाडाईच्या अभंगातून दिसते. तो अभंग- ‘एक कोटी अभंग लक्षवरती सोळा। प्रेमरस जिव्हाळा आऊबाईचा। चौऱ्याणव लक्ष रंगाईची बाकी। प्रेमे चक्रपाणी आळविले।। दोन कोटी अभंग येशा साखराई। कवित्व पाही दीड दीड कोटी ।।“ संत नामदेवांच्या कुटुंबात सर्वांनीच अभंगरचना केली आहे. आज त्यांच्या परिवारातील स्त्री संतांचे अभंग दुर्देवाने अतिशय कमी संख्येत उपलब्ध आहेत. अनेक स्त्राr संतांच्या अभंगरचनांची दखल न घेतल्याने त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. तत्कालीन काही स्त्राr संत वारकरी संप्रदायाच्या पटावरून नाहीशा झाल्या आहेत. बहुतेक स्त्री संत अज्ञात असून, बऱ्याच जणींची नावेसुद्धा कालप्रवाहात लुप्त होऊन गेली असावीत.
























































