अमेरिकेची ग्रीन कार्ड लॉटरीला स्थगिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि एमआयटीमधील गोळीबाराच्या घटनेनंतर ग्रीन कार्ड लॉटरी (डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्राम) तात्पुरती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कारण ब्राऊन युनिव्हर्सिटीचा हल्लेखोर याच लॉटरीद्वारे अमेरिकेत आला होता, असा दावा अमेरिकन सरकारने केला आहे.

होमलँड सिक्युरिटी सेव्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी एक्सवर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. ग्रीन कार्ड लॉटरीला तात्पुरते स्थगित केल्याचे क्रिस्टी नोएम यांनी सांगितले. ही योजना देशासाठी ‘आपत्ती’ असल्याचे त्यांनी म्हटले. ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि एमआयटीमधील गोळीबाराचा संशयित क्लॉडिओ नेवेस व्हॅलेंट या लॉटरीद्वारे अमेरिकेत आला होता म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

n ग्रीन कार्ड लॉटरी हा दरवर्षी कमी इमिग्रेशन असलेल्या देशांतील लोकांसाठी 55 हजार व्हिसा देणारा कार्यक्रम आहे. यामध्ये आफ्रिका, आशिया आणि काही युरोपियन देशांचा समावेश असतो. 2025 साली व्हिसा लॉटरीसाठी दोन कोटी लोकांनी अर्ज केला होता. यामध्ये लॉटरी विजेता आणि त्यांच्या कुटुंबातील मिळून सुमारे 1.31 लाख लोक निवडण्यात आले होते.

n ग्रीन कार्ड लॉटरी (डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्राम) वरील स्थगिती किती काळ राहील याबाबत ‘व्हाईट हाऊस’ने काहीच स्पष्ट केलेले नाही. जर हा निर्णय दीर्घकाळ राहिला तर अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणातील हे एक महत्त्वाचे वळण असेल.