
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 290 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये लेखा परीक्षण अधिकारी 02, लेखा अधिकारी 03, सहाय्यक लेखा अधिकारी 06, उपलेखापाल 03, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 144, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 16, उच्चश्रेणी लघुलेखक 03, निम्नश्रेणी लघुलेखक 06, कनिष्ठ लिपिक 46, सहाय्यक भांडारपाल 13, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 48 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 26 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://mjp.maharashtra.gov.in वर देण्यात आली आहे.

























































