
मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱयांचे प्रमाण वाढतेच आहे. रेल्वे प्रशासनाने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमा राबवल्या. या मोहिमांदरम्यान अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱया 27.51 लाख प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 164.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी आठ महिन्यांत प्रभावी कारवाई केली आणि 27.51 लाख फुकटय़ा प्रवाशांना पकडले. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या आठ महिन्यांच्या अवधीत 25.08 लाख इतके विनातिकीट प्रवासी सापडले होते. त्या संख्येच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फुकटय़ा प्रवाशांकडून 138.44 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

























































