
शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय, सर्वात मोठी आणि प्रतिष्ठsच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेसाठी गतविजेता अंजुमन इ इस्लाम इंग्लिश हायस्कूल आपले जेतेपद राखण्यासाठी अल बरकत इंग्लिश शाळेशी भिडणार आहे. मुंबईच्या शालेय क्रिकेट राजा कोण, याचा फैसला करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तीनदिवसीय अंतिम सामना 23 ते 25 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे.
उपांत्य फेरीत अल बरकतने पिछाडीनंतरही जनरल एज्युकेशन अॅपॅडमीचे 290 धावांचे जबर आव्हान इशान पाठकच्या खणखणीत 132 धावांच्या खेळीच्या जोरावर पार पाडले होते. तसेच अंजुमन इ इस्लामने ज्ञानदीप सेवा मंडळाचा चुरशीच्या लढतीत पराभव करत पुन्हा एकदा अंतिम फेरी धडक मारली. गेल्या वर्षी अंजुमनने उपांत्य फेरीत अल बरकतचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली होती. आता हे बलाढय़ दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येत आहेत. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांनी आपला नॉनस्टाप खेळ कायम राखत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या दशकभरात मुंबईतील शालेय क्रिकेट कितीही मजबूत झाले असले तरी हॅरिस असो किंवा गाईल्स या स्पर्धांच्या अंतिम चार संघांत हे दोन संघ हमखास असतात. विशेष म्हणजे दोन्ही संघ एकास एक असल्यामुळे जेतेपदाची ही झुंज अपेक्षेप्रमाणे चुरशीची होणार.
या वर्षी हॅरिस शिल्डमध्ये तब्बल 200 शाळांच्या संघांनी भाग घेतला असून शालेय क्रिकेटच्या इतिहासात हा एक विश्वविक्रमच होता. तसेच गाइल्स शिल्डलाही तब्बल तितकेच संघ खेळताहेत. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांतील क्रिकेटच्या मुळाशी असलेल्या जोशाला आणखी बळ मिळाले आहे.
स्पर्धेच्या या यशामागे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शालेय क्रिकेटला आज प्रतिष्ठsचे मैदान आणि सुविधा लाभल्या आहेत. यंदाही या स्पर्धांचे सामने वानखेडे, डी. वाय. पाटील, बॉम्बे जिमखाना, पारशी, हिंदू, इस्लाम आणि पोलीस जिमखाना तसेच सर्व प्रमुख मुंबईच्या मैदानांवर खेळविले गेले. तसेच दोन वर्षांपूर्वीपासून खेळाडूंना पुरस्कार देण्याची सुरू करण्यात आलेली परंपरा यंदाही कायम आहे.
अंतिम सामन्यासाठी 11 जणांचा संघ यातून निवडला जाईल
अल बरकत इंग्लिश शाळा – आदित्य पांडे, हार्दिक कुमार, इशान पाठक, प्रज्ञांकुर भालेराव, अरहान पटेल, अरहान सय्यद, नमीर तेली, स्वरुप गवईष मोहम्मद अली खान, अबरार शेख, युवराज पनवार, चिन्मय भरटे, अबू शेख, जय गुप्ता, सम्यक कदम, मुहम्मद सईग शिंगरे, सनी तामखादे.
अंजुमन इ इस्लाम इंग्लिश हायस्कूल – मोहम्मद खान, युवराज भिंगारे, शेन रझा, युवान शर्मा, मोहम्मद फारुकी, शाहिद खान, मोहम्मद आफी शेख, वेदांत कडू, रामप्रसाद विश्वकर्मा, साहिल यादव, आदित्य पाटील, रफी टाटली, कबीर जगताप, शाकिर शेख, वरद फडतरे, उमर खुटे.



























































