कांद्याची साल केराच्या टोपलीत टाकण्याची चूक तुम्हीपण करताय का?

अनेकदा आपण भाज्या कापताना कांद्याच्या साली निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु याच कांद्याच्या साली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत.

थंडीत हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

खासकरुन आपल्या सौंदर्यासाठी कांद्याच्या सालींचा उपयोग हा फार महत्त्वाचा मानला जातो. कांद्याच्या सालींचे आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित विविध फायदे आहेत. कांद्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. कांद्याची साल आरोग्यासोबत त्वचेसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे.

काळा लसूण का खायला हवा, वाचा

कांद्याच्या सालीचा वापर सौंदर्यासाठी कसा होतो हे जाणून घेऊया.

कांद्याच्या सालीमध्ये सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. याकरता कांद्याची साल ही पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. हे पाणी नंतर थंड करुन, या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणे कमी होते आणि कोंड्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांनी आहारात हा पदार्थ समाविष्ट करायलाच हवा

कांद्याच्या सालीचे पाणी हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे. कांद्याच्या सालीचे पाणी त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी साले उकळून पाणी थंड करावे. हे पाणी आपल्या चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने लावावे. यामुळे त्वचा उजळण्यास तसेच त्वचेवरील डाग हलके होण्यास मदत होते.

https://www.saamana.com/why-you-should-eat-at-least-one-teaspoon-of-flaxseeds-every-day-find-out/

कांद्याच्या सालीमध्ये असलेले क्वेरसेटिन हे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते. तसेच कांद्याची साल ही सूप, काढा किंवा चहामध्येही वापरु शकतो.

पोटदुखी, सूज किंवा अपचन होत असल्यास, कांद्याच्या सालीचा काढा हा खूप फायदेशीर ठरतो. साले पाण्यात उकळून कोमट पाणी प्यावे, यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

कांद्याच्या सालीमध्ये जळजळ कमी करणारे घटक असतात. सांधेदुखी, स्नायूंचा ताण किंवा सूज असल्यास, प्रभावित भागावर कांद्याच्या सालीचे पाणी लावल्याने आराम मिळतो.