
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला असून ‘उद्या 12 वाजता’, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. त्यामुळे जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच उद्या घडण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने 100 चा आकडा 100 टक्के पार करणार, संजय राऊत यांचा विश्वास
शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता असून याआधी संजय राऊत यांनीच शिवसेना-मनसे युतीची दोन दिवसात घोषणा होईल अशी माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. महायुतीतील पक्षांचे आता बारा वाजणार, अशी प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.
उद्या
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025





























































