‘पुष्पा 2’ नंतर अल्लू अर्जुन साकारणार ही भूमिका, चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क, वाचा सविस्तर

अल्लू अर्जुन पुष्पा २ या चित्रपटानंतर काय करणार हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. मिळालेल्या बातमीनुसार अल्लू अर्जुन आगामी बिग बजेट चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे आता समोर आले आहे. अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. हा त्यांचा चौथा चित्रपट एका पौराणिक कथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन कार्तिकेय स्वामींची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या जोडीचा एक प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट, अला वैकुंठपुरमुलू, दक्षिण भारतातील बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडला आणि त्या काळातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक बनला होता. सूत्रांनुसार आगामी चित्रपटाचे बजेट हे 1 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा आणि महत्त्वाकांक्षी पौराणिक चित्रपट म्हणून ओळखला जाईल.

या मेगा प्रोजेक्टची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात अपेक्षित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे.