Shiv Sena-MNS Alliance – शिवसेना-मनसे युतीची घोषणा!

महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. तमाम मराठी माणसाच्या मनासारखं घडत आहे. शिवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे.

वाचा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

  • मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतोय त्यात ते अल्ला हाफीज म्हटले आहेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत – राज ठाकरे
  • मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार! – राज ठाकरे
  • नाशिकमध्ये युती झालेली असून बाकीच्या महापालिकेतील युतीवर आज, उद्या शिक्कामोर्तब होईल – उद्धव ठाकरे
  • शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करतो आहोत – राज ठाकरे
  • जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सगळ्या उमेदवारांना दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची हे आपल्याला कळवले जाईल – राज ठाकरे
  • कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या खूप टोळ्या फिरताहेत, त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात – राज ठाकरे
  • कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा हे मी एका मुलाखतीत म्हटलो होतो. तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली – राज ठाकरे
  • मराठी माणूस सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण त्याच्या वाट्याला कुणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही – उद्धव ठाकरे
  • भाजपने बटेंगे तो कटेंगे हा जो अपप्रचार केला होता, तसेच मी मराठी माणसाला सांगतो आता जर चुकाल तर संपाल. आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका – उद्धव ठाकरे
  • मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणीही वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्या शिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत – उद्धव ठाकरे
  • न्यायहक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. इतकी वर्ष व्यवस्थित गेले. पुन्हा आपण पाहतोच की मुंबईचे लचके, चिंधड्या उडवण्याचे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे आहेत – उद्धव ठाकरे
  • आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच सेनापतींमधील एक सेनापती. त्यांच्यासोबत माझे वडील शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खे ठाकरे घराणे त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होता – उद्धव ठाकरे
  • 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण होणे स्वाभाविक आहे – उद्धव ठाकरे
  • महापौर हा मराठीच होणार आणि ठाकरे बंधुंचाच होणार – मनसे नेते संदीप देशपांडे
  • शिवसेनिक, मनसैनिकांची हॉटेल ब्ल्यू सीबाहेर तुफान गर्दी
  • ठाकरे बंधू एकाच गाडीने हॉटेल ब्ल्यू सीकडे रवाना
  • शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.

  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत सोनचाफ्यांचा हार अर्पण केला.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

  • ठाकरे बंधू एकाच गाडीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे रवाना
  • मराठी माणूस एक आहे आणि एक राहील. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील. आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक, पुणे या महानगरपालिका आहेतच. इथे आमची जागा वाटपाची चर्चा संपली आहे. यासह इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे, तिथेही आम्ही एकत्र लढण्यासंदर्भात काम करत आहोत – संजय राऊत

मुंबई मराठी माणसाची हाच सगळ्यात मोठा अजेंडा, हाच वचननामा!- संजय राऊत

  • उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल

  • पत्रकार परिषदेआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेणार